[imageframe lightbox=”no” lightbox_image=”” style_type=”none” hover_type=”zoomin” bordercolor=”” bordersize=”0px” borderradius=”0″ stylecolor=”” align=”none” link=”” linktarget=”_self” animation_type=”0″ animation_direction=”down” animation_speed=”0.1″ animation_offset=”” hide_on_mobile=”no” class=”” id=””] [/imageframe][separator style_type=”none” top_margin=”” bottom_margin=”25px” sep_color=”” border_size=”” icon=”” icon_circle=”” icon_circle_color=”” width=”” alignment=”center” class=”” id=””]

बोन्साय, हे नाव जपानी वाटते. ही कलाही जपानी असल्याचाच सगळीकडे समज आहे. जपानमध्ये याबद्दल बरेच लिहिले-बोलले जाते. जपानमध्ये बोन्सायची मोठमोठी मार्केटस आहेत. जपान प्रमाणेच, चीन, थायलंड, इंडोनेशिया, व्हियेतनाम अशा अनेक पौर्वात्य देशांमध्ये ही कला बहराला आली आहे.

खरे तर, ही अस्सल भारतीय कला आहे. भारतामध्येच या कलेचा उगम झाला आणि त्याचवेळी तिचा विकासही झाला होता. ‘वामनवृक्ष कला’, असे या कलेचे नाव आहे. विष्णूने वामनाचा अवतार घेतल्याची कथा आहे. वामन म्हणजे आकाराने छोटा. त्याच धर्तीवर छोटे झाड तयार करण्याचा या कलेला ‘वामन वृक्ष कला’, असे नाव होते.

भारतामध्ये प्राचीन काळी, झाडांपासून औषधे तयार करण्याचे शास्त्र होते. वैद्य जंगलात, डोंगरात जाऊन, वनस्पतींची पणे, मुळे गोळा करून आणत आणि त्यांपासून औषधे तयार करीत. पुढे त्यांचे वय झाले, की त्यांना जंगलात, डोंगरात जाणे अशक्य व्हायचे. यावर उपाय म्हणून त्यांनी ती झाडेच आपल्या घरात आणली. आपल्या घरातील कुंडीमध्ये आणली आणि त्याचा उपयोग सुरु केला. तीच ‘वामन वृक्ष कला’.

भारतामध्ये बौद्ध धर्माचा उगम झाला आणि हा धर्म पूर्वेकडच्या देशांमध्ये पसरला. भारतामधून बौद्ध भिक्षु, भारताबाहेर गेले आणि जाताना त्यांनी छोट्या कुंड्यांमधून, आपल्याबरोबर हे वामन वृक्षही नेले. जपानमध्ये भिक्षु गेले. तिथेच ही कला पसरली आणि बहराला आली. तिथे तिचे नाव झाले ‘बोन्साय’. तिथूनच hi कला जगभर पसरली.

भारतामध्ये थोड्या थोड्या प्रमाणावर, बोन्सायची ही कला ठिकठीकाणी दिसते. काही गट आहेत. हे गट एकत्र येऊन काही काही काम करताना दिसतात. मात्र हे काम त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.

‘बोन्साय नमस्ते’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनानिमित्त भारतामधली ही कला पुन्हा भारतामध्ये परतत आहे. २२ ते २५ फेब्रुवारी २०१८ मध्ये आयोजित करण्यात आलेले, भारतामधले बोन्सायचे आजवरचे सर्वात मोठे प्रदर्शन आहे.

प्राजक्ता काळे यांनी ३५ वर्षांच्या अथक प्रयत्नातून, साकारलेली ही कला आणि एक हजारपेक्षा जास्त बोन्साय, या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील.

खरे, तर असा हा प्रयत्न पहिल्यांदाच भारतामध्ये होत आहे. पुण्यात होणारे हे प्रदर्शन म्हणजे पुण्याने भारताला दिलेली एक अनोखी भेट आहे.